Aastha - Home for the Needy

Overall Objective of the Project:

 1. ज्यांना आधाराची गरज आहे त्या व्यक्तींना हक्काचे घर उपलब्ध करून देणे.

 2. ज्यांना आधाराची गरज आहे अश्या व्यक्ती म्हणजे कोण? - वृध्द, निराधार असलेल्या एकल महिला (विधवा, परितक्त्या, घटस्पोटीता, प्रौढ कुमारीका, इ.), व 18 वर्षांवरील परंतू आधाराची गरज असलेली मुल-मुली.

 3. प्रकल्पात त्यांना काय मिळेल? - सुरक्षीत, दोन वेळचे पोटभर जेवण देणारे, आरोग्यसेवा व योग्य त्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणारे, व आवश्यक तेव्हा फक्त सांभाळ करणारे घर. 

Description of the Program / Activities, FAQs:

 1. 20 गरजू लोकांसाठीचे हक्काचे घर - आस्था निवासी प्रकल्प

 2. गरजू म्हणजे कोण – ज्यांना आधाराची, या हक्काच्या घराची गरज आहे, पण ज्यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नाही, अश्या वयाच्या 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती.

 3. निवडीसाठी, या प्रकल्पाचा लाभार्थी होण्यासाठी, काही निकष असतील का? –

  1. ज्यांना आधाराची गरज आहे त्यांची, त्यांनी दिलेल्या माहिती व आपण मिळवलेल्या माहितीच्या आधारावर, या प्रकल्पासाठी निवड करण्यात येईल.​

  2. सुरवातीला त्या व्यक्तींना, ज्यांची खुप जास्ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे त्यांना (उदा. मानसिक रूग्ण, अंथरूणाला खिळलेले किंवा हालचाल करता येत नाहीत अश्या व्यक्ती, इ.), या प्रकल्पासाठी निवडण्यात येणार नाही कारण त्यांची काळजी घेण्यासाठी लागणारे मनुष्यबळ व इतर साधन-सामग्री आपल्याकडे नाही, नसणार. परंतू एखाद्या व्यक्तीवर प्रकल्पात दाखल झाल्यानंतर अशी परिस्थिती ओढवल्यास त्यांची मात्र प्रकल्प सर्वोतोपरी काळजी घेण्याचा (उपलब्ध निधी, साधन-सामग्री व मनुष्यबळ यांच्या मर्यादा लक्षात घेउन), किंवा त्यांची इतरत्र चांगली व्यवस्था करण्याचा, प्रयत्न करेल.

  3. मात्र याव्यतिरीक्त इतर कुठलीही, उदा. आर्थिक परिस्थिती, कुटूंब, जात, समाज, लिंग, इ. वर आधारीत, अट किंवा निकष नसेल.

 4. या घरात या लोकांना काय मिळेल? –​

  1. त्यांना जोपर्यंत या घराची आवश्यकता आहे तोपर्यंत सुरक्षीत निवारा,​

  2. आवश्यक तो सकस आहार,

  3. काम करण्याची, शिकण्याची, आत्मविश्वास जागवण्याची संधी,

  4. शक्य तितक्या चांगल्या आरोग्यसेवा.

 5. यासाठी त्यांना काही पैसे द्यावे लागतील का, काम करावे लागेल का? - ज्यांना शक्य आहे त्यांनी खर्चास अवश्य हातभार लावावा असे आवाहन करण्यात येईल पण ज्यांना शक्य नाही त्यांचा त्यांना गरज असेपर्यंत सांभाळ करण्यात येईल. परंतू ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्य ते काम करावे ही अपेक्षा असेल. किंबहुना त्यांना शक्य ते काम उपलब्ध करून देण्याचा, त्या कामाचा योग्य मोबदला मिळवून देण्याचा, व त्याद्वारे त्यांचा आत्मविश्वास जागविण्याचा प्रयत्न केला जाईल.

 6. प्रकल्पाचा खर्च कसा भागविला जाईल? – या प्रकल्पाच्या खर्चासाठी पूर्णपणे मदतीवर अवलंबून न राहता, तो काही प्रमाणात तरी भागवता यावा यासाठी आम्ही या प्रकल्पा सोबतच, प्रकल्पाचा भाग म्हणूनच, एक खानावळ (आस्था भोजनालय, गाडगे नगर, अमरावती) सुरू केली आहे व शक्य असल्यास इतरही काही निगडीत छोटे व्यवसाय सुरू करण्याचा विचार व प्रयत्न करत आहोत. तरीही, हा प्रकल्प सुरळीत व नियमीतपणे चालवण्यासाठी आम्हाला मदतीची आवश्यकता आहेच.

Budget, Support Required:

 1. आमच्या अंदाजानुसार या प्रकल्पासाठी अपेक्षीत असलेला खर्च हा जवळपास 5000 ₹ प्रती व्यक्ती, प्रती महीना एवढा आहे.

 2. प्रकल्पाचाच एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या आस्था भोजनालयातून या प्रकल्पाचा खर्च काही प्रमाणात भागविण्यात मदत होणार आहे. परंतू सुरवातीच्याच दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढल्यामुळे व त्यामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे भोजनालयापासून अपेक्षीत असलेले उत्पन्न सध्या मिळत नाही आहे. त्यावर उपाययोजना सुरू आहेत पण त्यांचा परिणाम होण्यासाठी थोडा वेळ लागेल असे दिसत आहे. त्यामुळे, व एरवीही, हा प्रकल्पा सुरळीत व नियमीतपणे चालवण्यासाठी आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहेच. शक्य असल्यास व शक्य ती मदत अवश्य कराल.

तुम्ही प्रकल्पाला कश्या प्रकारे मदत करू शकता:

 1. एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण खर्च उचलून (जो जवळपास 5000 ₹/व्यक्ती/महिना एवढा आहे). सध्या पुण्यातील आमच्या नात्यातील एका दांपत्याने या प्रकारे एका व्यक्तीचा संपूर्ण खर्चाचे दायित्व स्वीकारले आहे.

 2. तुम्हाला सहज शक्य ती रक्कम नियमीतपणे देणगी स्वरुपात देऊन उदा. दरमहा 100 ₹, 200 ₹, 500 ₹ देणगी स्वरुपात देऊन. किंवा आपल्या प्रियजनांच्या स्मृतिदिनास, वाढदिवसास, आपल्या घरातील एखाद्या मंगल प्रसंगी सहज शक्य ती रक्कम देणगी स्वरुपात देऊन. सध्या आमच्या परिचयातील (अमरावतीमधील देखील) काही व्यक्ती या प्रकारे प्रकल्पास मदत करत आहेत.

 3. निवासी प्रकल्पासाठी विविध प्रकारचे साहीत्य लागत असते उदा. अन्न - धान्य, औषधे, कपडे, रोजच्या वापरातील वस्तू, व इतर साहीत्य (उदा. bed, beddings, भांडे, खुर्च्या, पुस्तके, इ.). यापैकी तुमच्याकडील काही तुम्हाला उपयोगात येणार नसलेले पण तरीही वापरण्यायोग्य असलेले सामान प्रकल्पास भेट म्हणून देऊन. आमच्या परिचयातील, व काही अपरिचित, व्यक्तींनीही या प्रकारे प्रकल्पास मदत केली आहे.

 4. सध्या हा प्रकल्प भाड्याने घेतलेल्या जागेत सुरू आहे. त्यामुळे जर तुमच्या कडे या प्रकल्पासाठी सुयोग्य अशी जागा असल्यास ती प्रकल्पाला वापरण्यासाठी देऊनही तुम्ही आम्हाला मदत करू शकता.

 5. आपल्या घरातील, office मधील छोट्या - मोठ्या कार्यक्रमांसाठीचे catering चे काम आपल्या आस्था भोजनालयाला देऊन व बाहेरून काही जेवण वगैरे मागवायचे असल्यास ते आस्था भोजनालयातून मागवून (सध्या आमची घरपोच सेवा सुरू आहेच व लवकरच तुम्ही Zomato किंवा Swiggy वरूनही order देऊ शकाल) देखील तुम्ही आपल्या प्रकल्पाला मदत करू शकता. आणि हो, आस्था भोजनालय हे एका सेवा भावी प्रकल्पाचा भाग असले तरीही येथील जेवण मात्र उत्तम, चविष्ट व ग्राहकांना परवडणारे असावे असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे व राहील.

 6. आणि तुम्ही प्रकल्पास भेट देऊन, प्रकल्पातल्या लोकांना कामाची संधी देऊन, त्यांच्याशी बोलून, प्रकल्प अधिक चांगल्या रीतीने कार्यरत व्हावा म्हणून काही सूचना असल्यास त्या देऊनही तुम्ही आम्हाला मदत करू शकता.

following is the extract of a google sheet which will provide information about the present residents of our Aastha - Home for the Needy